बोधकथा

Wednesday 23 August 2023

We are on the moon......

चंद्रयान हे भारतासाठी नेहमीच एक आव्हानात्मक मिशन राहिले आहे. सलग दोन प्रयत्न फसल्यानंतर आज संपूर्ण जगाचे लक्ष भारतावर केंद्रित होते. जे जगाने नाही बाळगले ते अशक्यप्राय असे दक्षिण ध्रुवावर उतरण्याचे एक वेगळे लक्ष्य इस्रोने बाळगले होते. भले भले देश जे करू शकले नाही ते इस्रोने अत्यंत कमी म्हणजे 615 कोटींमध्ये करायचे ठरवले. अनेकांनी हे शक्य नाही असे म्हटले. पण आज इस्रोने सिद्ध केले की सगळचं शक्य आहे! भारत हा चंद्राच्या खडतर अशा दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी इस्रोचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. महत्वपूर्ण म्हणजे चंद्रावर आतापर्यंत जगातील फक्त चार देश यशस्वीरीत्या चंद्राला स्पर्श करू शकले आहेत...
हा प्रवास कधीच सोपा नव्हता.....
समस्त भारतीयांची मान आज अभिमानाने ताठ झाली आहे.
भारतीय वैज्ञानिक,त्यांचे तमाम समर्थक आणि समस्त भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन.क्षणाक्षणाला आपली हुरहूर वाढत असताना आपल्या शास्त्रज्ञांनी अगदी काटेकोर नियोजन अखेर स्वप्नवत मोहीम पूर्ण केली...
विश्वविजेता भारत....
जागतिक महाशक्ती भारत...
भारत माता की जय....

We are on the Moon........

No comments:

Post a Comment