बोधकथा

एक भारत श्रेष्ठ भारत - भाषा संगम उपक्रम


कृपया येथे Click करा...





दि . १९.११.२०१८

प्रति,
      विभागीय शिक्षण
      उपसंचालक (सर्व)
      प्राचार्य , DIECPD (सर्व)
      शिक्षणाधिकारी,मुंबई
      शिक्षणाधिकारी (प्राथमिक/
      माध्यमिक), जिल्हा परिषद
      (सर्व)
      शिक्षण निरीक्षक, मुंबई (सर्व)
      प्रशासन अधिकारी न.प/  
      न.पा. (सर्व)
*यांनी..*
*सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांच्या मुख्यापकांना अवगत करुन द्यावे.*

*विषय : “एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत - भाषा संगम” कार्यक्रमाचे आयोजन करणे बाबत .*

*1)* भारत सरकारने राष्ट्रीय
एकात्मता वाढीसाठी “एक भारत श्रेष्ठ भारत (EBSB)” हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अनुषंगाने *दि.२० नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०१८* या कालावधीत *“भाषा संगम”* हा उपक्रम सर्व शाळांमधे सर्व भारतीय भाषांबद्दल अधिक प्रेम व आपुलकी निर्माण होण्याच्या दृष्टीने घ्यावयाचा आहे.
       
*2)* देशातील २२ भाषांमधील सामान्यत: बोलली जाणारी पाच साधी वाक्ये परीपाठामधे विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यावयाची आहेत. यासाठी आवश्यक असलेली माहितीपुस्तिका      https://goo.gl/PfNDUu   या लिंकवर उपलब्ध आहे.

 *3)*“भाषा संगम” अंतर्गत घ्यावयाच्या उपक्रमाचे वेळापत्रक माहिती पुस्तिकेच्या (पान क्र II ) वर दिले असून पुढीलप्रमाणे कृतिकार्यक्रम घ्यावा.
   i) ज्या तारखेला  जी भाषा संवादासाठी सुचवली आहे, त्या भाषेची ५ वाक्ये परिपाठात वाचावीत. (उदा. दिवस पहिला - असामी, दिवस दुसरा - बंगाली) शिक्षक, पालक, शासकीय कर्मचारी किंवा ग्रामस्थ यांना अशी वाक्ये वाचण्यासाठी निमंत्रित करावे .
ii) काही विद्यार्थ्यांना या वाक्यांवर  आधारित भित्तीपत्रके (posters) तयार करण्यास सांगावीत व तयार केलेली भित्तीपत्रके शाळेमध्ये सर्वत्र लावावीत. व या संदर्भाने इतर काही पुरक उपक्रम घ्यावेत.

 *4)* सोबत दिलेल्या माहिती पुस्तिकेच्या पान क्र.V वरील मुद्दा क्र. 3 ( i ते xii ) नुसार सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेत राबवलेल्या दैनंदिन कार्यक्रम व उपक्रमांचे videos, photoes “Bhasha sangam youtube channel” वर दररोज सायंकाळी 5 वाजेपर्यंत अपलोड करावेत.

*5)* या उपक्रमासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून प्राचार्य DIECPD यांनी काम पहातील.
जिल्हा नोडल अधिकारी यांनी वरील माहितीचे दिनांकनिहाय संकलन करून या कार्यालयाच्या  marathilangdept@maa.ac.in  या इमेलवर दररोज  पाठवावी.

*6)* क्षेत्रीय स्तरावर कार्यरत सर्व अधिकाऱ्यांनी “भाषा संगम” कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टीने शाळाभेटी कराव्यात.

*अधिक माहितीसाठी उपक्रमाचे राज्य संपर्क अधिकारी डॉ.जगराम भटकर (उपसंचालक भाषा विभाग) (९४२३७२८४८६) यांच्याशी संपर्क करावा.*

 


No comments:

Post a Comment