बोधकथा

Saturday 29 July 2023

ग्रेट भेट

ग्रेट भेट...

हिंदूधर्मसंस्कृती मंदिर, धंतोली चे वतीने दिनांक 28 जुलै 2023 शुक्रवारला संध्याकाळी 6:30 वाजता प्रसिद्ध लेखक व संशोधक श्री अक्षय जोग ,पुणे यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाली.
व्याख्यानाचा विषय होता -  
       “ वैचारिक लेखन : महत्व,पूर्वतयारी आणि संधी.”
       या विषयावर त्यांनी अतिशय मार्मिक असे मार्गदर्शन केले.भविष्यवेधी लिखाणाच्या गरजा,उद्दिष्ट्ये व स्वरूप कसे असावे याविषयी त्यांनी चिंतनीय असे संबोधन केले.
        अक्षय जोग यांनी अतिशय कमी वयातच एक उत्तम संशोधक व वैचारिक लेखक म्हणून ख्याती प्राप्त केली आहे. “ स्वा सावरकर : आक्षेप आणि वस्तुस्थिती ” या त्यांच्या पुस्तकाच्या 3 वर्षात 13 आवृत्त्या निघाल्या आहेत. स्वा. सावरकर यांच्यावर सलग दहा वर्षे संशोधनपर अभ्यास करून त्यांनी सावरकरांचे कार्य आपल्यासमोर मांडतानाच त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांचे सप्रमाण खंडन केले आहे.
 सर्वांनी नक्की वाचा 
 “ स्वा.सावरकर आक्षेप आणि वास्तव ” सावरकरांवरील आक्षेपाचे सप्रमाण खंडन

प्रकाशक : मृत्युंजय प्रकाशन, पुणे

No comments:

Post a Comment