भारतीय लोकांची दुहेरी मानसिकता भाग 1 लिहून झाल्यानंतर पुनश्च एकदा भाग 2 लिहावासा वाटला कारण हे आमचे अखंड पुराण एक दोन भागात संपणारे नव्हे.अखंड हरिनाम सप्ताह करणे गैर नाही पण त्याच्या नावाखाली हजारोंच्या लोकांच्या पंगती उठवणे व शेकडो किलो अन्नाची नासाडी करणे हे कितपत योग्य आहे याचा कुणी विचार करणार आहेत काय???आधीच पोट भरलेल्याना आवाज देऊ देऊ खाऊ घालायचे की, दुष्काळी भागात ते धान्य पाठवायचे याचा साधा निर्णय जर होऊ शकत नसेल तर काय कामाचा तो हरिनाम सप्ताह...एकीकडे लोकांना प्यायला पाणी नाही आणि इकडे वर्गणी गोळा करून सगळीकडेच खानावळी सुरु आहेत.बरं हे धार्मिक प्रबोधन सर्वच धर्मात अखंड सुरु असते फक्त नावे वेगवेगळी असतात.त्याचे फलित काय होते हा संशोधनाचा विषय आहे.धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार अथवा स्मारके उभी करण्याऐवजी आम्ही वाचनालये का उभी करू नये??? असा प्रश्न आयोजकांना जेव्हा पडेल त्या दिवशी आम्ही खरे वैचारिक स्वातंत्र्य मिळविले असे मानावे लागेल.लाखो रुपये वर्गणी गोळा करायची आणि बाबा लोकांना,कव्वाली वाल्याना अथवा जलसे वाल्याना पैसे मोजून बोलवायचे.....आतातर महापुरुषांच्या नाचे DJ पण सुरु झाले आहेत.आपण समाज प्रबोधन करत आहोत असा भाबडा समज लोकांनी करून घ्यायचा व स्वतःची पाठ थोपटून घेण्यात जर आम्ही धन्यता मानत असू तर मग आमच्या शिक्षणाचा उपयोग काय??आणि त्याचवेळी एखाद्या गावातील अथवा शहरातील जीर्ण झालेली शाळा हे सर्व सोहळे खाली मान टाकून बघत असते.योगायोग म्हणजे त्याच शाळेतून शिक्षण घेतलेली व पांढरी कापड घालून मिरविणारी भंपक राजकीय मंडळी असले सोहळे करण्यात आघाडीवर असतात.अभ्यासिका नाही,अभ्यासाला पुरेशी पुस्तके नाही,संदर्भ ग्रंथ नाहीत आणि आम्ही फक्त skill development च्या बाता मारणार.यात गाव पुढाऱ्यांची हाजी हाजी करण्यात धन्यता मानणारे गुरुजन वर्गही आघाडीवर आहेत.सुशिक्षित म्हणून ह्यांना सगळी पंचक्रोशी ओळखते आणि हे गुरुवर्य विविध सोहळ्यांच्या पावत्या फाडण्यात मग्न असतात.आता कुठे गुरुजींनी शाळेसाठी पावत्या फाडणे सुरु केले आहे.त्याचा फार छान परिणाम दिसून येत आहे.हेही येथे नमूद करावेसे वाटते.लहान लहान गावात मोठी मोठी भव्य धार्मिक स्थळे उभी राहत आहेत त्यांचे ऐश्वर्य बघून आमचे डोळे दीपत आहेत आणि भावी भारत पान टपरीवर खर्रा घोटता घोटता अथवा पंक्चर दुरुस्त करता करता आपले भविष्य शोधत आहे.असे हे एकूण चित्र आहे.यावर कमी म्हणून की काय?सरकार कुठलेही असो त्यांची संकुचित मानसिकता यावर भाष्य न केलेले बरे. आमचे आमदार खासदार आपला निधी कुठे देतील तर सभा मंडप नाहीतर एखादे समाजमंदीर बांधायला.....बस्स...एखाद्या लोकप्रतिनिधींनी कुठे आपल्या निधीतून वाचनालय अथवा अभ्यासिका उपलब्ध करून दिली असेल तर शप्पथ.हं पण आपल्या क्षेत्रात अ वर्ग आणि ब वर्ग किती धार्मिक स्थळे आहेत यांची याना पूर्ण कल्पना असते. मूठभर गाव पाटलांनी संपूर्ण समाजाला वेठीस धरून सगळा बाजार मांडलाय.एखाद्या गरीब मुलीचे लग्न होऊन पैसे वाचेल एवढ्या भव्य मिरवणुका,लाखो करोडो रुपये उधळायचे,मिरवायचे आणि त्यात त्यांनी पन्नास उधळले तर मी साठ उधळतो अशी घातक मानसिकता वाढीस लागते आहे.हे सगळं होऊन ज्यांची ऐपत नाही ते आपल्या मुलींचे गळे दाबून त्यांचे आयुष्य संपवित आहे.
ज्यांची ऐपत नाहीये त्यांनी आपल्या पोरींचे गळे दाबून मारायचे काय??? ज्यांनी जीवनदान द्यायचे तेच डॉक्टर कोणतीही तमा न बाळगता स्त्री भ्रूण हत्यांमध्ये सहभागी होत आहेत.बरं यांना जर कुणी जाब विचारला तर पुन्हा हे संपावर जाऊन गरीब रुग्णाचा जीव घ्यायला मोकळे.
एक राजकीय महीला स्वतःची स्मारके उभारण्यावर सात हजार करोड रुपये खर्च करते आणि याउलट भारतीय अवकाश संशोधन संस्थेने एखाद्या अंतराळ मोहिमेवर जर 450 कोटी रुपये खर्च केलेत तर आपल्याला आपल्या देशाची गरिबी आठवते.यासारखे दुसरे दुर्दैव काय असावे??? मागे एकदा मारिया शारापोव्हा नावाच्या महिला टेनिसपटूने सचिन तेंडुलकरला ओळखत नाही असे म्हणून आपल्या अकलेचे तारे तोडले होते.तेव्हा आपण किती गहजब केला होता,पण आपल्यापैकी किती जणांना सीता साहू हे नाव माहिती आहे.आठवलं काय? नाही ना....पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील दुहेरी सुवर्ण पदक विजेती आता पाणीपुरी विकून आपली गुजराण करत आहे.आम्ही मात्र मारियाला शिव्या देऊन मोकळे झालोत.आमच्या देशात कायदा,शांतता,सुव्यवस्था व संरक्षण करण्याची जबाबदारी ज्या पोलीस व सैनिकांना देण्यात आली आहे त्यांना लाठ्या आणि बंदुका चालविण्यास मज्जाव आहे.मजेची गोष्ट म्हणजे ज्यांचे सरंक्षण करायचे आहे ते आणि ज्यांच्यापासून संरक्षण करायचे आहे ते असे दोघेही मिळून संरक्षण दलाला कधी दगड तर कधी मारहाण करत असतात.नुकताच झालेला छत्तीसगढ मधील नक्षली हल्ला आठवा.अंदाधुंद गोळीबार करून 26 जवानांना ठार करण्यात आले व कित्येक जखमी आहेत.याचे नेमके कारण काय तर या दलांचे मुख्य कार्य बाह्य व अंतर्गत शत्रूवर आक्रमण करून शत्रूंचा बिमोड करणे हे असते आपण त्यांना शोभेच्या बहुलीसारखे करून ठेवले आहे.सरंक्षण दले अधून मधून आक्रमक कारवाई करत असते पण नेमके त्याच वेळी देशातील तथाकथित बुद्धिजीवी,बिनडोक टाळकी,Secular Gang, मेणबत्ती टोळी याना जाग येते व यांची कोल्हेकुई सुरु होते.
आमच्या देशात कन्हैया व खालिद वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर असतात व शहीदांचे फोटो आतल्या पानावर.....वृत्तवाहिन्यांवर तर विचारूच नका त्यांचा मुख्य हिरो हाच कन्हैया आहे.सैनिक तर त्यांच्या लेखी शून्य आहेत....
तरीही आम्ही लोकशाही धर्मनिरपेक्ष गणराज्यात राहणारे सुशिक्षित पुरोगामी आहोत असा दावा करणारच.....(क्रमश:)...
जय हिंद...
गणेश...
No comments:
Post a Comment