बोधकथा

Tuesday, 11 April 2017

The Country with Double Standards...

नित्यनियमाने जगणाऱ्या सामान्य मध्यमवर्गीय माणसाने थोडा जरी विचार केला तर त्याला नेहमी एक प्रश्न पडत असावा की, जगातील लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश,सर्वाधिक भाषा बोलणारा एकमेव देश,बहुधर्मीय,प्रत्येक ठिकाणी बदलत जाणारी भाषा, वेशभूषा, खानपान,नृत्यकला संगीत इतके सगळे वैशिष्टय जपुनही एकसंघ वाटणारा हा देश कुठेतरी अनोळखी म्हणा किंवा आपल्या मनाला प्रत्येक गोष्टीत चटका लावून जाणारा वाटतो.अगदी वेगळा,विचार करायला लावणारा.म्हणजे आपण कितीही global वगैरे इ.गोष्टी करत असलो तरी आपण कुठेतरी संकुचित होत आहोत.उंच पर्वत आणि विशाल नद्यांचा हा आपला देश.विविधतेत एकता असे आपण कितीही जरी ओरडून सांगत असलो तरी आपली ढोंगबाजी रोज नित्यनियमाने सुरु असते.आपला समाज हा नेहमीच आपल्या सोयीने वागत असतो.इतका समृद्ध वारसा लाभुनसुद्धा आपल्या देशात प्रचंड विसंगती दिसून येते.हे एक विदारक सत्य आहे.अगदी वेद काळापासून सुरु असलेली ही विसंगती अगदी आजपर्यंत सुरु आहे.रंग,धर्म,वेशभूषा, विविध चालीरीती यावरून आपल्या देशात अगदी टोकाचे मतभेद आहेत अथवा आपल्या सोयीनुसार आपण प्रत्येक गोष्टीचा अर्थ काढत असतो.आपल्या समाजात स्त्री पुरुषांना सामान अधिकार आहेत व त्यांना समान वागणूक मिळते असे आपण नेहमीच ऐकत असतो.वरील वाक्य खरच सत्य आहे काय?आपला समाज आजही स्त्री - पुरुष समानता प्रस्थापित करण्यास अपयशी ठरला आहे.हे आपण मान्य केलेच पाहिजे.रोजचे वर्तमानपत्र जरी चाळले तरी आपणास स्त्री अत्याचाराचे कितीतरी उदाहरणे दिसून येतील.घरातील लग्न समारंभात,एखाद्या मुलीच्या लग्नात तिने पारंपरिक कपडेच परिधान करावे असा आग्रह असतो तर दुसरीकडे मात्र पुरुष हा 3 piece suit घालूनच अवतरला पाहिजे असा आमचा गोड अट्टाहास असतो.आपला भारत हा असा देश आहे  एकीकडे जिथे देवीची पूजा केली जाते तर दुसरीकडे केवळ मुलगी आहे म्हणून तिची गर्भात अथवा जन्मानंतर हत्या केली जाते.मुलगी म्हणजे ओझं ही मानसिकता सोडायला अजूनही समाजातील खूप मोठा वर्ग तयार नाही.केवळ मुलगी आहे म्हणून प्रत्येक गोष्टीत तिला कमीपणा ठरलेलाच आहे.या देशातील 60% मुली बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत हे एक जळजळीत वास्तव आहे.भारतीय लोकांना चित्रपटात मुख्य भूमिकेत 40-50 वर्षाचा नट चालतो पण नटी मात्र विशीतलीच हवी.नायक विवाहित चालतो पण नायिका नको.एखादा बलात्कारी,दरोडेखोर,खुनी प्रार्थनास्थळात गेला तर ते आम्हास चालते पण एखाद्या स्त्रीला तिच्या मासिक नित्यक्रमाचा आडोसा घेऊन प्रार्थनास्थळात प्रवेश वर्ज्य ठरविणे हे आपल्या समाजास भूषणवाह वाटते.एखाद्या बलात्कार पीडितेला बलात्कार करणाऱ्यापेक्षा जास्त अपमानास्पद वागणूक मिळते.त्यात जर अत्याचार करणारा विशिष्ट धर्माचा असला तर मग विचारूच नका.तो भटकलेला तरुण असतो असे आमच्या भंपक धर्मनिरपेक्ष राजकारण्यांना वाटते.तिला न्याय मिळणे तर दूर तिचे साधे पुनर्वसन करायचे म्हटले तरी आपले कायदे??? आडवे येतात.आणि वरून स्त्रियांनी काय घालावे आणि काय घालू नये याचे तत्वज्ञान पाजायला आम्ही तयार.एखादी स्त्री रात्री अपरात्री एकटी दिसली तर आमच्या भुवया उंचावणारच.हाच प्रकार जगातील इतरही देशात होत असतो.आपल्या देशात सौंदर्य म्हणजे गोरेपणा हा अलिखित कायदा आहे.या कोडग्या समजुतीमुळेच गोरेपणा नसलेल्या महिलांचे जगणे असह्य झालेले आहे.विविध जाहिराती,चित्रपट याद्वारे गोरेपणा म्हणजेच सौंदर्य याचा सतत भडीमार होत असतो.आम्ही भगवान कृष्ण आणि कालीमातेची पूजा करू पण सौंदर्य हे गोरेच असावे हा आमचा आग्रह.आपल्या न्यायव्यवस्थेने दारूची दुकाने बंद करण्याऐवजी  6 आठवड्यात त्वचा गोरी करण्याचा दावा करणाऱ्या जाहिरातीवर बंदी लादावी.परस्त्रीला घरी आणून मद्य पिऊन पार्टी करणे गैर नाही.असा निवाडा देणारी आपली व्यवस्था दुसऱ्या दिवशी सरकारला तुम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी कुठली पावले उचलली?? असे विचारते तेव्हा हसायला येते.डान्स बार अथवा night club वर सरकारने घातलेली बंदी बेकायदेशीर होती असे सांगून उलट त्यांना संरक्षण देऊन ते डान्स बार पुन्हा सुरु करण्यात धन्यता मानणारी आपली व्यवस्था रोडवरील बार बंद करून आपले पापक्षालन करू इच्छित असेल तर मग त्यावर उपाय नाही.कायद्याचं पुस्तक एकच पण श्रीमंतांना वेगळा न्याय व गरिबांना दुसरा न्याय हा प्रकार आपल्याला नवीन नाही.श्रीमंतांचे अनधिकृत बांधकामे नियमित होतात व गरीबांची झोपडी जमीनदोस्त.जलीकट्टू या बैलांच्या खेळावर बंदी आणून प्राणी प्रेमाचा आव आणणारे प्राणीमित्र भारतात भौगोलिक परिस्थती नसतानाही पेंग्विन पक्षी आणून त्यास बंदिस्त करून आपला अहंपणा दाखवितात व त्यास सरकारी खाती मंजुरी देतात  तेव्हा आपल्या संपूर्ण व्यवस्थेची काळ्जी वाटते. पाकिस्तानी कलाकार भारतात यावे.त्यामुळे दोन्ही देशाचे संबंध सुरळीत होतील असा दावा करणारे मूर्ख शिरोमणी व तोंडाला काळे फासले असूनही टी.व्ही वर आपले तोंड दाखविणारे कुलकर्णी व त्यांचे पिलावळ कुलभूषण जाधवला पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा जाहीर केली तेव्हा कोणत्या बिळात लपून बसतात हा संशोधनाचा विषय आहे.हे भंपक मैत्रीचे पुरस्कर्ते आपल्याच देशात असतात त्या देशात का नसतात???ज्या देशात महेश भट्ट नावाचा माणूस विचारवंत म्हणून गणला जातो त्या देशाचं भविष्य काय सांगावं.....ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी,वर्णभेद,जातीभेद निर्मूलनासाठी घालविले ज्यांनी देशाला नवी दिशा दिली त्यांचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान काय????असे प्रश्न विचारणारे बिनडोक टाळके विजय मल्ल्या,सचिन आणि रेखा राज्यसभेवर निवडून गेलेत की खुश होतात.या महोदयांची तेथील कामगिरी काय तर शून्य आणि त्यांना निवडून देणारी आपली व्यवस्था हे सगळेच अनाकलनीय आहे.
                   वरील उदाहरणे ही फक्त निवडक म्हणून सांगता येतील असे हजारो उदाहरणे आहेत जेथे भारतीय लोकांचे Double Standard दिसून येते आणि त्यातच आम्ही समाधानी आहोत.।।।नजीक भविष्यात यात कुठलाही बदल संभवत नाही......

गणेश.

No comments: