जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री,
आणी निरंतर राहते ती मैत्री,
आणी फक्त मैत्री.....
मैत्रीविषयी अनेक सुंदर कविता आपण रोजच कुठे ना कुठे वाचत असतो.खरंच मैत्री एक अप्रतिम नातं आहे जे नितांत सुंदर आहे.आपले सर्वस्व पणाला लावण्यास सदैव तत्पर असणारे आपले मित्र हेच आपले खरे वैभव.असे जिवाभावाचे मित्र ज्याला मिळाले तो खरा श्रीमंत. पूर्वीच्या तुलनेत आजची मैत्री जास्त निकोप आणि निखळ आहे.निखळ मैत्रीत नात्यातील मोकळेपणा आवश्यक असतो.तो सध्याच्या मैत्रीत बघायला मिळतो. तसं पाहिल्यास मैत्री म्हणजे एक प्रामाणिक व प्रेमळ नातं.जिथे आपले मत कुठलाही पूर्वग्रह अथवा संकोच न बाळगता व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळते ती खरी मैत्री.प्रत्येक व्यक्तीला मित्र मैत्रिणी असतात,प्रत्येकाचा मैत्रीचा अनुभव वेगळा असतो आणि हा अनुभवच आपणास आयुष्याच्या पूर्णत्वाची अनुभूती देत असतो. जीवाला जीव देणारा मित्र असावा असे प्रत्येकालाच वाटत असतं.एखाद्या वाईट प्रसंगी किंवा आपण जेव्हा एकटे पडतो तेव्हा आपल्या कुटुंबियांसोबत आपल्या मदतीला धावून येतात ते आपले मित्र अथवा मैत्रिणी.जेव्हा वाईट प्रसंगी साथ देणार कुणी नसतं,आपल्या मनात चित्रविचत्र विचार येतात तेव्हा व्यक्तीला मैत्रीचे खरे महत्व पटते.आयुष्यातील बहुतेक नाती ही आपल्याला जन्मापासून मिळत असतात.मैत्रीचं नातं हे असं आहे जे आपणास निवडायला पूर्ण वाव मिळतो.आपला जिवलग मित्र कसा आणि कोण असावा हे ठरविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आपणास मिळते.आपल्याला समजून घेणारी व्यक्तीच आपला चांगला मित्र अथवा मैत्रीण बनू शकते.मैत्रीला काळाची अथवा वेळेची बंधने नसतात.अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तिसोबतसुद्धा आपली मैत्र होऊ शकते.असं म्हणतात की मैत्री जितकी जुनी तितकी चांगली , तितकीच नाजूक पण असते.त्यामुळे ती काळजीपूर्वक जपणे हे आपले कर्तव्य आहे.माझ्या मते पती--पत्नी हे एकमेकांचे चांगले मित्र होऊ शकतत्.ज्या घरात पती पत्नी मित्र मैत्रिणीसारखे राहतात ते कुटुंब मजबूत असते. काही चित्रपटामध्ये मैत्रीची संकल्पना फार सुंदर रेखाटलेली आहे.आजच्या नवीन पिढीमध्ये मैत्रीची ही भावना फार खोलवर रुजलेली आहे.पूर्वी यावर थोडी बंधने यायची.पण आता पूर्ण स्वातंत्र्य मिळालेले आपण बघतो आहोत.मुलामुलींच्या निखळ मैत्रीचे अनेक सुंदर उदाहरणे आपल्या आजूबाजूला सहज दिसतात.मैत्री म्हणजे केवळ आनंदाचे क्षण उपभोगायची वस्तू नाही तर ती एक परीक्षा आहे.मैत्रीतून खूप काही शिकायला तर मिळतेच पण विचारांच्या कक्षा रुंदावण्यास निश्चितच मदत होते.मैत्री कुणाशीही असो ती नक्कीच आयुष्य जगण्याची प्रेरणा देते. आजकाल मित्र-मैत्रिणींशी संपर्कात राहण्याचे बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मैत्री निभावणं सोपं झालं आहे असं म्हणता येईल.फेसबुक आणि व्हाट्स ऍप्प मूळे तर मित्रमैत्रिणीशी संपर्कात राहणे एकदम सोपे झाले आहे.पण मैत्री ही नुसती online न राहता घरापासून सुरु होऊन अगदी मनाचा ठाव घेणारी असावी.नाहीतर नुसतंच कुणी आपल्या सोबत चालत आहे म्हणून तो आपला मित्र होत नाही आणि केवळ एकत्र दिसणारा गोतावळा म्हणजे मित्र मैत्रिणींचा समूह नाही होऊ शकत.त्यांच्यात मैत्रीचे सूर जुळणे आवश्यक असते.मैत्री ही निस्वार्थ असली पाहिजे.त्यात स्वार्थ आला की तिला मैत्री म्हणता येणार नाही.चोवीस तास एकत्र राहन्याला मैत्री नाही म्हणता येणार त्याला केवळ सहवास म्हणता येईल.खूप वर्ष न भेटताही मित्रांमध्येही हे अतूट नाते टिकून असते.एकमेकांना भेटण्याची आतुरता आणि आपुलकी या दोन गोष्टीवरच हे नाते टिकून राहते.मैत्रीचं नातं हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे.त्यामुळेच मैत्रीचा निर्मळ झरा सदैव खळखळत वाहत राहण्यास मदत होते.पूर्वीच्या बंदिस्त जीवनात व्यक्त व्हायला फार वाव नव्हता पण आज काळ बदलला आहे.खरं नातं व्यक्तीस व्यक्त होण्यास वाव देते.आमचे आजचे मित्र हे खरे मित्र असं आम्ही अभिमानाने म्हणू शकतो ते याच कारणामुळे.एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या आमच्या मित्रांनीही कधी कोणत्याही परिस्थतीत साथ सोडली असेल असे अजूनही स्मरणात नाही.म्हणूनच आमच्यात सशक्त बंध निर्माण होऊ शकले.हे येथे अभिमानाने नमूद करावेसे वाटते.आजकाल मुलं-मुली एकमेकांबरोबर मोकळेपणाने वावरतात.त्यांचं जग हे त्यांनाच ठाऊक असते.लोक कितीही नाव ठेऊ द्या.शेवटी प्रत्येक गोष्टीला दोन बाजू ह्या असतातच.शेवटी एखादी गोष्ट दिसते कशी यापेक्षा आपण त्या गोष्टीकडे बघतो कसे यावर बरचसं अवलंबून असतं.मित्र मैत्रिणी निवडण्याचं जरी आपल्याला स्वातंत्र्य असले तरी स्वातंत्र्य हे जबाबदारी वाढविते आणि जबादारी निट पार पाडली कि स्वातंत्र्य उपभोगता येते.दरवर्षी Friendship day येतो,कुठे उत्सव साजरा होतो तर कुठे विरोध होतो.वास्तविक पाहता वर्षातील प्रत्येक दिवस हा मैत्रीचा असतो पण समजा एखादा दिवस जर आपण त्या नावानेच साजरा करतो म्हटले तर चुकले कुठे???पण तो दिवस आपण कसा आणि कुठे साजरा करतो यावर खूप काही अवलंबून असतं.मैत्री ही सुंदर संकल्पना आहे. तिचे सौंदर्य टिकविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे म्हणून मित्र जपा.त्यांच्या गुणदोषासह त्यांना आपलेसे करा.उगाच एखाद्याला त्याच्या उणिवांची जाणीव करून देऊ नका.एखादा मित्र जर दुरावला असेल तर त्याला जवळ करण्याचा प्रयत्न करा.गाड्या मोटारीतून जरूर फिरा पण आपले लहानपणीचे सायकलवरचे मित्र जपून ठेवा.नवीन online मित्र नक्की जोडा पण दुःखात आपल्याला आपला लहानपणीच मित्रच आठवतो.अहंकार हे सर्व दुःखाचे मूळ आहे तसेच मी पणा हा मैत्रीच्या शेवटास कारणीभूत ठरतो.नौकरी,कुटुंब व आपले मित्र असा क्रम नेहमी जपा.मी खूप व्यस्त आहे निदान ही सबब तरी आपल्या जवळच्या मित्रांना सांगू नका करणं कामाच्या ओघात तोही व्यस्तच असतो.त्याला प्रतिसाद द्या.आज शक्य नसेल तर उद्या द्या,पण त्याच्या आवाजाला प्रतिसाद जर द्या.नाती जपा,जिव्हाळा वाढवा,सुसंवाद वाढवा....
Coz...We are Friends..forever and ever...
गणेश...
No comments:
Post a Comment