बोधकथा

Wednesday, 5 October 2016

चीनचे फटाके व आमचे राष्ट्रवादी लवंगी बॉम्ब

          रोज सकाळी उठल्यावर व्हाट्स app व फेसबुक उघडताच आजकाल एक msg नित्यनियमाने येऊन धडकतो.तो म्हणजे चीन मध्ये उत्पादीत सामानावर बहिष्कार टाका चीनी सामान घेऊ नका इ. असा त्यात मजकूर असतो.प्रत्येकाला आपले मत ठामपणे मांडण्याचा अधिकार आपणास मिळाला आहे व तो आपण नित्य नेमाने बजावत असतो.
           रोज सकाळी उठून कोलगेट ने दात घासणारे, Dove,Cinthol,Lux साबण व Clinic Plus, Head & Shoulder  shampoo वापरून आंघोळ करणारे,फेअर & lovely चा यथेच्छ वापर करून त्यावर Ponds पावडर चा मुलामा चढवणारे कथित भारतीय? लोक मग आपले राष्ट्रप्रेम दाखविण्यासाठी Facebook व Whats app वर चीन विरोधी विधाने पोस्ट करून आपले बेगडी राष्ट्रप्रेम दाखवत असतात.म्हणजे दैनंदिन जीवनातील 80% उत्पादने अमेरिका व युरोपीय बाजारपेठेतील वापरायची व नंतर वेळ मिळाला की,60/- रुपयाला मिळणाऱ्या चीन निर्मित रोषणाई करणारे सामान, फटाके वा इतर साहित्याना विरोध करून थोडे पुण्य कमाविण्याचे समाधान मिळवायचे.कारण काय तर चीन हा पाकिस्तानचा मित्र आहे.
            मी काही चीन या देशाचा समर्थक नाही अथवा त्यांच्या सामानाचा brand ambassador.प्रश्न एवढाच आहे की,चीन हा जर पाकिस्तानचा मित्र आहे ते मग अमेरिका पाकिस्तानचा कोण आहे??चीन ने तर त्यांच्या देशातील दहशतवादी गटांना अगदी निष्ठुरपणे चिरडून टाकले आहे.तसे अमेरिका कधी करणार आहे.चीन ने पाकिस्तान ला जी सरंक्षण सामुग्री दिली आहेत ती त्यांनी पैसे घेऊन दिली आहे.अमिरीकेने तर पाकिस्तान ला फुकट पैसे व विमानेही वाटली आहेत.मागे अमेरिका पाकिस्तानला दहशतवाद्यांशी लढण्यासाठी F_16 ही अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली विमाने फुकट देणार होती.त्याचा वापर पाकिस्तान आपल्या विरुद्ध करणार नाही याची शाश्वती अमेरिका आपणास देणार होती काय???मग बहिष्कार अमेरिकेचा का नाही???आपल्या देशात दहशतवादाला खतपाणी घालणारा व सतत भारताविरुद्ध त्याचा वापर करणारा पाकिस्तान हा देश अमेरिकेचा मित्र देश आहे.अमेरिकासुद्धा या दहशतखोर देशाची आतंकवादाविरुद्ध आमचा साथीदार अशी हुजरेगिरी करताना दिसतो. तसे आजपर्यंत कधी चीन ने केलेले आठवत नाही.
            मुक्त व्यापार धोरणात प्रत्येक देश जागतिक व्यापार करण्यास मोकळा आहे.चीनच्या मालाची गुणवत्ता सतत चर्चेत असणारा विषय असतो.परिस्थिती  कुठलीही असो दोन देशातील व्यापार सहसा थांबत नसतो.ती एक गरज असते.अगदी मागच्या आठवड्यात भारताने अचानक पाकमध्ये घुसून Surgical Strike केला तेव्हापन दोन देशातील व्यापार हा सुरूच होता.कारण दोन देशातील व्यापार अथवा संबंध संपुष्टात आणणे म्हणजे आपल्या शेजारील व्यक्तीला तु माझ्या विहिरीवरून पाणी भरू नकोस असे म्हणण्याऐवढे सोपे नसते.बरं ज्यांचा चीनी सामनाला विरोध आहे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी व न्याय मागावा.भारत सरकार कधीच अशी व्यापार बंदीची भाषा नाही वापरत.मग ही अशी बंदीची मागणी करणारी लाट येते कुठून जिचा काहीच उपयोग नाही.
           एक मात्र आहे की चीनी मालावर जनजागृती होणे गरजेचे आहे.यावर कुणाचेही दुमत नाही.पण ही जनजागृती विधायक मार्गाने होणे आवश्यक आहे.आता दिवस सण समारंभाचे आहेत.काही गरीब मंडळी रस्त्याच्या कडेला जागा मिळेल तिथे आपली दुकाने मांडून बसतात.त्यांनाही लहान मुले असतात.त्यांनाही दसरा,दिवाळी साजरी करायची असते.Mall मधून कपडे न घेऊ शकणारी ही मंडळी आपली दिवाळी 100-200 रुपयांचा माल विकून साजरी करणार असतील तर त्यांचा हा आनंद हिरावण्याचा अधिकार आपणास दिला कुणी??? चीनी मालाच्या विरोधाच्या नावाखाली आपण त्यांची दुकाने उचलून नाही फेकली म्हणजे झालं.त्यांची दुकाने उचलून फेकल्याने नुकसान चीन या देशाचे नाही तर त्या गरीब कुटुंवाचे होईल.त्या निरागस जीवाची दिवाळी होणारच नाही.तेव्हा त्यांचा डोळ्यातील अश्रू थोपविण्याची हिम्मत आपल्यात असेल तर त्यानेच या उचापती कराव्यात.चीनी माल महागड्या Mall मध्ये पण मिळतो म्हणून तो मॉल उचलून फेकण्याची हिंम्मत आहे का आपल्यात?????
           बंदूकीचे उत्तर हे बंदूकीनेच दिले पाहिजे,व आपला  एक सैनिक शाहिद झाला तर त्यांचे दहा सैनिक गारद झालेच पाहिजे.पण म्हणून आपण सामान्य जनतेने वड्याचे तेल वांग्यावर काढायचे काय????आंतरराष्ट्रीय राजकारणातले बारकावे खूप क्लिष्ट असते.त्यासाठी सक्षम मंडळी आहेत.आपण लक्स,सिन्थोल,Dove इ.साबण Head & Shoulder,clinic plus shampoo अथवा Colgate,Denim Jeansवापरणे कधी सोडणार आहोत.याचा पैशाने अमेरिका fighter plain बनवून ते पाकिस्तानला फुकटात वाटते ना.तेव्हा आपण मुके का होतो???फरक एवढाच असतो की ती उत्पादने mall मध्ये मिळतात आणि चिनी दिवे अथवा light रस्त्यावर.युद्धज्वर तेवत ठेवणे ही राजकारणाची गरज असते.तेव्हा त्याचा संदर्भ देऊन social media वर दिशाभूल करणे थांबले पाहिजे.जसा एक संदेश 11 group वर पाठविल्याने काही होत नाही तसेच चिनी मालाविरुद्ध धुराळा उडवून आपण काय करत आहोत याचा विचार व्हायला हवा.Valentine day ला विरोधाच्या नावाखाली आपण युवक-युवतींना अमानुष मारहाण होताना दरवर्षी बघतो.तसेच चीनी मालाच्या विरोधाखाली गरीब व निराधार जनतेला मारहाण नाही झाली म्हणजे माझी दिवाळी सुखात गेली असे मी म्हणेन.।।।।।
           "टोकाच्या अतिरेकी राष्ट्रवादापेक्षा पोटाची भूक मोठी असते"
           असे माझे वैयक्तिक मत आहे.

       ।।।।।    गणेश...।।।।

1 comment: