आजच्या ज्ञानरचनावादी व तंत्रस्नेही युगात विद्यार्थ्यानी स्व-हस्तलिखित व स्व-निर्मित उपक्रम व प्रकल्प तयार करावेत असे शासनाला वाटते ही बाब निश्चितच आनंददायी बाब आहे.शासनाने यावर्षी प्राथमिक व उ.प्राथमिक शाळांनी प्रकल्प राबवावेत यासाठी एक विशिष्ट धोरण तयार केलेले आहे.या धोरणाला धरूनच वर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने संपूर्ण जिल्ह्यात एकसूत्रता यावी यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्यावर अंमलबजावणी सुरू केली. आज वर्धा जिल्ह्यात शालेय स्तरावर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचे काम जोमात सुरु आहे.
प्रकल्प अथवा उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या खऱ्या भाव विश्वात घेऊन जात असतात.आपल्या भाषेत तटपुंजे का होईना पण त्यांना ते प्रकट होण्याचे एक माध्यम असते.कुठलेही बंधन न घालता त्यांना दिलेली ती एक संधी असते असे मला वाटते. प्रकल्प आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास वाव देते.त्यांच्या संघ भावना वाढीस चालना देते.एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय कोणतीही गोष्ट पूर्ण होत नसते.एखाद्या घटकावर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांना त्या घटकाच्या अगदी मुळापर्यंत जाऊन संशोधन करण्याची प्रेरणा देते.पारंपरिक पुस्तक केंद्रित पद्धतीपेक्षा हा एक वेगळा मार्ग असतो.यातून विद्यार्थी जिज्ञासू बनतो त्याला विविध प्रश्न पडतात व त्याची उकल तो त्याच्या प्रयत्नांनी करत असतो.त्याच्या आत्मविश्वासात भर पडून त्याची अभ्यासविषयक गोडी वाढते.हळूहळू त्यांचे वडीलधाऱ्या व्यक्तीसोबत व संवगड्यांसोबद सवांद कौशल्य विकसित होत जाते.आपल्या कार्याकडे अथवा ध्येयाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा दृष्टीकोन बळावतो. पारंपरिक परीक्षा पद्धतीपेक्षा प्रकल्प हा मूल्यमापन करण्याचा एक सोपा व उत्तम मार्ग आहे असे म्हणता येईल कारण यात विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासनाला खूप वाव असतो.लांब लचक उत्तरे अथवा निबंध लिहिण्याऐवजी कृतीवर आधारित संशोधनात्मक प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी खूपच आनंददायी व उपयुक्त ठरू शकतो.
प्रकल्पाचा विषय निवडताना मुलाना पूर्ण स्वातंत्र्य देऊन त्यांच्या आवडी निवडी जपण्याचे काम आपण करायला हवे.तरच तो अनुभव त्यांना आयुष्यभर सोबत देईल.
बोधकथा
- Home
- संकलित मूल्यमापन
- बोधकथा
- बालगीते
- सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे (हिंदी)
- आपला वर्धा जिल्हा
- राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा
- शाळा साहित्य
- Computer Shortcut Keys
- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
- अभ्यासाचे तंत्र व मंत्र
- चालू घडामोडी
- महत्वाचे पर्यावरणविषयक व सामाजिक दिवस
- विरामचिन्हे
- 100% मूलभूत वाचन विकास
- NAS अध्ययन स्तर निश्चिती
- संवर्गनिहाय जात माहिती
- मराठी स्वराज्याचा इतिहास
- शिक्षकांची कर्तव्ये आणि भूमिका
- सेवा पुस्तक नोंदी..नियम व अटी
- श्री सुरज वैद्य यांची व्यंगचित्रे
- एक भारत श्रेष्ठ भारत - भाषा संगम उपक्रम
- Tech Sudha You Tube Channel
- सातवे वेतन आयोग अधिसूचना
- शाळा सिद्धी मानके व मूल्यांकन आराखडा
- मतदार यादीत शोधा आपले नाव
- राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा मसुदा 2019 ( मराठी )
- सामान्य ज्ञान
Tuesday, 4 October 2016
प्राथमिक शिक्षणात प्रकल्पाचे महत्व...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment