बोधकथा

Monday, 24 October 2016

कठीण प्रश्नाचे सोपे उत्तर...

      मागील काही महिन्यांपासून देशात एक युद्धमय वातावरण तापले आहे.त्यात उरी हल्ल्यानंतर आणखीनच भर पडली.सगळा देश ढवळून निघाला.देशातील जनतेचा रोष बघता सरकारला आपले नेहमीचे बोटचेपे व वेळकाढू धोरण गुंडाळून ठेवावे लागले.यावेळी आपले लष्करही संतापले होते त्यांना मोकळीक देणे आवश्यक होते.तसे यावेळी घडले व आपल्या लष्कराने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आणि आमच्या रागावर फुंकर मारली.काश्मीरप्रश्नी प्रथमच भारत सरकारने एक रोखठोक भूमिका घेतली हे महत्वाचे .त्यातून संपूर्ण जगात एक संदेश गेला जगातील बहुतेक सर्व प्रमुख देश यावेळी व भारतासोबत होते.निर्णय यासाठी महत्वाचा कारण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वरिष्ठ नेतृत्वाने शांततेचे नोबेल पारितोषिक मिळविण्याच्या नादात काश्मीर प्रश्नांचे पूर्णतः वाटोळे केले.मग तो पश्न युनोमध्ये नेणे असो वा 1971 च्या युद्धात पाकचे 90 हजार सैनिक आपल्याकडे युद्धबंदी असताना कुठलीही अट न घालता किंवा तेव्हा पाकव्याप्त काश्मीर परत न मागता केवळ प्रतिमा सवर्धनाच्या नादात आपण तेथेही कच खाल्ली.1999 च्या कंदहार विमान अपहरण प्रकरणात आपण तीच कच खाल्ली व मौलाना अझहर मसूद ला सोडून दिले.आज तोच मसूद भारतापुढे खूप मोठा यक्षप्रश्न बनून वाकुल्या दाखवत आहे.आता प्रश्न हा उरतो की, कंदहार प्रकरणात अडकलेल्या लोकांपैकी किती लोकांच्या नातलगांनी सरकारला त्या मसूदला कुठल्याही परिस्थितीत न सोडण्याची मागणी केली होती काय?सगळेच आपल्या आप्तस्वकीयांसाठी चिंतीत होते ना? असायलाच पाहिजे.मग आपण त्या नातेवाईकांना देशद्रोही ठरवायचे काय?नाही ना.नेमकं तेच इतर गोष्टीसाठी लागू होतं,पण आपण आपली मते सहज बनवून घेतो आणि याला त्याला देशप्रेमाची अथवा देशद्रोहाची प्रमाणपत्रे वाटत असतो.नेमका हाच अनुभव करण जोहर नामक एका चित्रपट निर्मात्याला आला असावा.चित्रपट तयार करून पैसे कमविणे हा त्याचा उद्योग.15 रुपये टमाटर झाले की आम्हा भारतीयांना म्हणे घाम फुटतो.पण त्याचवेळी चित्रपटाचे 350 रुपयांचे एक तिकीट घेऊन सेल्फी काढणे आपल्याला आवडते.चित्रपट हे निव्वळ पैसे कमाविण्याचे माध्यम आहे हे माझे ठाम मत आहे.अतिशय कमी व सन्माननीय अपवाद वगळता;चित्रपट हे समाजमनाचे चित्रण करते अथवा सामाजिक प्रश्न मांडतो हे थोतांड गळ्यात घेऊन जे लोक फिरतात त्यांचा भ्रमनिरास झाला की मग जाग येते.करण जोहर ने कुण्यातरी फवाद या पाक कलाकाराला घेऊन चित्रपट काढला म्हणून काही लोकांना अपचन झाले. हे काही भारतात प्रथमच घडलेले नाही.पाक हा आपला सामान्य जनतेचा शत्रू आहे व तेथील कलाकाराला येथे आणून नाचवू नये हे KJ ला समजत होते पण त्याने तो शहाणपणा केला कारण त्याला माहिती होतं की, पैसे मिळवायचा हा एक सोपा मार्ग आहे.ज्याप्रमाणे देशी रणजी क्रिकेट सामन्यांना बगल देऊन IPL मध्ये विदेशी खेळाडू खेळवले व cheer girls नाचवल्या की,भारतीय क्रिकेट चा विकास होतो असे काही जाणत्या लोकांना वाटते.तसाच नियम KJ ने चित्रपटाला लावून बघितला.फवाद म्हणे tourist visa घेऊन भारतात आला व त्याने चित्रपटात अवैधपणे काम केले (without working permit) असा काहीच दावा आहे.तो बरोबर जरी मानला तरी मग आपण थोडं काही बिनसलं कि बस पेटवितो,जाळपोळ करतो,तोडफोड करतो त्याचे आपण रीतसर Permit काढतो काय?याची संमती आपणास कोण देतं???याचा विचार कोण करणार.विदेशी नागरिक देशात येऊन काय करतात यावर नजर ठेवायचे काम केंद्रीय गृहमंत्रालायाचे आहे.तेव्हा हे मंत्रालय काय करत होते?हे विचारायचे सोडून आपण आपल्या जोरावर एका टुकार निर्मात्याला धारेवर धरून कठीण प्रश्नाचे सोपे उत्तर शोधत असतो व देशभक्तीचे खोटे समाधान मिळवून देत असतो.मुळात पाक हा आपला शत्रू आहे व त्या  देशासोबत आपल्या देशाचे कुठलेही संबंध नाहीत असे सरकारने आधी जाहीर करावे नंतर जर KJ वा इतर भामट्यांणी चित्रपट निर्मितीचे प्रयत्न केल्यास आपणास त्यावर कायद्देशिर कारवाई करता येईल.तसे न करता परस्पर आपण समांतर सरकार चालविल्यासारखे कायदा हातात घ्यावा काय?उरी हल्ल्यानंतर ते आजपर्यंत भारत-पाक व्यापार सुरूच आहे ना? त्याचं काय?भारत सरकारने पाकिस्तानसोबत सर्व संबंध तोडण्याची तसदी का घेतली नाही?किंवा surgical strike वर प्रश्नचिन्ह उभारणारे काही राजकीय पक्ष तशी मागणी का करत नाही हे सामान्यजनांना न सुटणारे खूप मोठे कोडे आहे.तीच गोष्ट चिनी सामानाची.देशप्रेमाच्या नावाखाली चीनी  सामनाला विरोध करायचा व तसे न करणाऱ्याला सकाळ संध्याकाळ देशाची शपथ द्यायची हे आता नवे उद्योग सुरु आहेत.आपल्या पैकी किती देशभक्तांना माहिती आहे की,Nagpur Metro चे डबे एक सरकारी मालकीची चिनी कंपनी The China Railway Rolling Store Corp. (CRCC)तयार करत आहे.मग आता आपण नागपूर मेट्रो वर बहिष्कार टाकणार आहोत काय????गुजरात येथे प्रस्तावित लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा धातूचा पुतळा 3000 कोटी रुपये खर्चून चीन येथे तयार होत आहे.आता बोला?आहे काही उत्तर.सरकारी पातळीवरून जर हे उपक्रम सुरू असतील तर मग 50 रुपयांच्या चिनी लवंगी फटाक्यावरून आमची देशभक्ती  मोजण्याचा अधिकार काही तथाकथित देशभक्तांना दिला कुणी???आपणही विचार न करता तसले msg forward करतो.गरीबांनी चार दोन रुपयाचे लवंगी फटाके विकले अथवा खरेदी केले तर त्याला भ्रमित करायचे व  सर्व पक्षीय सरकार जे करत आहे किंवा करत होती त्यावर चूप राहायचे हेच तथाकथित लोकांचे धोरण आहे.माहितीच्या महाजालात आपले स्वतंत्र मत दाबून काहीतरी वेगळेच आपल्या मनावर बिंबविण्याचा उद्योग रोज सुरु असतो.त्यापासून आपण सावध असलेले बरे.आपल्या आलिशान BMW अथवा AUDI गाडीच्या मागे स्वदेशी चे बोर्ड लावून स्वदेशी या मुद्द्यावर लोकांना भुलविणारे महाभाग आपल्या देशात खूप आहेत.स्वदेशी वस्तू वापरल्याच पाहिजे;पण कुणी म्हणते म्हणून नाही तर आपल्या मनाला पटते म्हणून!!!हे महाभाग ज्या laptop वरून स्वदेशी चे Power Point Presetation करतात तो लॅपटॉप made इन चीन (PRC)असतो.व त्यातील सुटे भाग Intel कंपनीचे व operating system Windows ची असते.मग तेव्हा काय होते यांच्या स्वदेशी मंत्राला.मूळ समस्येच्या मुळाला हात लावायचा नाही पण त्या समस्येचे सोपे उत्तर शोधून त्यावर मन समाधान मिळवायचे हाच काय तो आजकालचा नवीन राजकीय म्हणा अथवा सामाजिक उद्योग आकारास येत आहे.सरकारे कुठलीही असो अथवा कुठल्याही राजकीय पक्षांची असो,आंतरराष्ट्रीय राजकारणात वावरताना त्यांना सर्व बंधने पाळून वागावे लागते.ती आंतरराष्ट्रीय अपरिहार्यता असते.तिकडे सीमेवर आपले जवान सजग पहारा देत आहेतच.गरज आहे ती फक्त झुंडशाहीचा वापर करून याच्या त्याच्यावर देशभक्ती लादणाऱ्या प्रवृत्तींना आवर घालण्याची.या प्रवृत्तीमुळेच सामान्य माणसात भ्रम व अविश्वास तयार होत आहे.देश सगळ्यांचा आहे व या देशातील प्रत्येक नागरिक देशभक्त आहेच.देशभक्तीचे प्रमाणपत्र आम्हाला कुणाकडूनही नको आहे.
    जय हिंद

          ।।गणेश।।

No comments:

Post a Comment