खुल्या बाजारात जिथे तिव्र स्पर्धा आहे.तिथे entry करावी ती Reliance JIO सारखी.अगदी धडाक्यात.सध्या भारतात सर्व राष्ट्रीय मुद्दे बाजूला पडलेले दिसत आहेत.सगळीकडे म्हणजे अगदी पानटपरिपासून ते whats app,facebook वर एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे Reliance communication या बलाढ्य कम्पनीने नुकतीच सादर केलेली त्यांची नवीन 4 G सेवा.या आधीपण विविध कंपन्यांनी आपली 4G सेवा सुरू केलेली आहे.त्यामानाने reliance ला थोडा उशीरच झाला असे म्हणायला हरकत नाही.
Air tel,idea ,यांनी तर ही सेवा फार अगोदर सुरु केली.जेव्हा airtel ची ती बहुचर्चित मुलगी देशातील लोकांना हिमालयात अथवा ईशान्य भारतातील दऱ्याखोऱ्यात आपल्या 4G चे नेटवर्क चे promotion करत होती तेव्हा reliance चे 4G येणार येणार अशी चर्चा सुरु होती. शेवटी एकदा ते आलेच,नुसते आलेच नाही तर त्यांचे सारे प्रतिस्पर्धीच नव्हे तर तमाम भारतीय जनता अवाक झाली.काहीजण तर अजूनही त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत.ऐरटेल व आयडिया या कंपन्यांना जवळजवळ 23000/- कोटी चा फटका बसला.यावरून याची तीव्रता लक्षात यावी.
इतर कंपन्या जेव्हा पंरंपरागत जाहिरातीवर भर देत होत्या तेव्हा मुकेश अंबानी यांनी सरळ सरळ आपली 4G सेवा ही सुरुवातीलाच भारतातील 10 कोटी लोकांसाठी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली व टप्प्याटप्प्याने ती ग्रामीण भारतात उपलब्द्ध होणार आहे.भारताला एका नव्या युगात घेऊन जाणारी हि क्रांती आहे.यात कुठेही blackout डे नसणार आहे.लोकांच्या गरजा ओळखून आणलेली हि एक आक्रमक योजना आहे.भारतातील मोबाईल वापराची परिभाषाच यामुळे बदलणार हे नक्की.एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्या खिशात आले आहे.
हे सगळे होत असताना whatsapp व facebook वर याची प्रतिक्रया न उमटल्या तर नवलच.प्रतीक्रिया उमटल्या नेहमीप्रमाणे.चांगल्या,काही नकारार्थी, लोकांनी आपला हक्क बजावला...काही लोक तर खोटा प्रचार करत होती की मोबाईल कधीपण बंद होईल,आपण reliance च्या हातचे बाहुले बनू इ.ते लोक हे विसरले होते की मोबाइल कम्पन्यांच्या मनमानीला चाप लावायला भारतात TRAI नावाची संस्था कार्यरत आहे.हा एक गोष्ट मात्र खरी आहे की reliance ही काही धर्मदाय संस्था नाही तर ती एक व्यावसायिक संस्था आहे.त्यामुळे ती कंपनी त्यांचे हित हे संभाळणारच.
या सगळ्या गोष्टीत सगळ्यात जास्त चर्चा झाली ती Reliance 4G च्या जाहीरातीत आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा झालेला वापर.यावरून खुप प्रश्न उभे झालेत. एका व्यावसायिक कंपनीने आपल्या जाहिरातीत देशाच्या पंतप्रधानाच्या फोटोचा वापर करावा काय? यावर चर्चा सुरु झाली.उद्योगांना प्रोत्साहन देणे ही या सरकारची प्राथमिकता आहे.reliance ने जाहिरातीत फोटो छापण्याअगोदर पंतप्रधान कार्यालायची रीतसर परवानगी घेतलेली होती व ती परवानगी त्या कार्यालयाने reliance ला दिली होती.Digital India हा मोदिंचाच नारा आहे.त्याला साद देत reliance आपली हि सेवा सुरू केली व जाहिरात दिली.इतर प्रतीस्पर्धी कंपन्यांना हि बुद्धी सुचू नये याला मुकेश अंबानी अथवा पंतप्रधान कार्यालय काय करणार???किंवा इतर कंपन्यांनी आम्ही तशी परवानगी मागितली होती हे सिद्ध करावे...
शेवटी काय तर JIO जसा इतर प्रतिस्पर्ध्याना एक धडा आहे तसा भारतीय ग्राहकांना एक पर्याय आहे.शेवटी आपली गरज ओळखून पर्याय निवडणे कधीही चांगले.खुल्या बाजारातील या स्पर्धेने जर आपला फायदा व आपल्याला पर्याय मिळणार असतील तर आपण त्याचे स्वागतच केले पाहिजे.मग तो पर्याय उपलब्ध करून देणारी संस्था reliance च असावी असा आग्रह नको.ग्राहकांनी आपले सर्व पर्याय खुले ठेवणे हि बाजाराची पहिली गरज आहे.कारण विविध पर्याय निवडीचे हत्यार स्पर्धा निर्माण करते व स्पर्धेतूनच JIO चा उदय होतो म्हणून सध्या तरी हेच म्हणता येईल की, जुग जुग JIO Reliance.........
1 comment:
Jug Jug Jio Reliance
Post a Comment