प्रति,
मा.मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य,
यांच्या सेवेशी विनम्र सादर,
विषय:- विनोदवीर कपिल ....यांच्या tweet संदर्भात
मार्फत: एक त्रस्त सामान्य नागरिक
महोदय,
खूप दिवस झालेत आपल्याला काहीतरी लिहावं असे वाटत होते पण आपणास कशाला उगाच त्रास म्हणून ते टाळलं.पण नंतर दृक्श्राव्य माध्यमातून कळले कि,आपण अतिविशिष्ट लोकांच्या तक्रारीची अतिशीघ्र दखल घेता.आम्ही अतिविशिष्ट अथवा विशिष्ट पण नाही!.साहेब आमच्या पण काही समस्या आहेत,निराकरण होणार नाही हे पक्क माहित आहे.भारत सरकारने जारी केलेले ओळखपत्र(Passport) जवळ असूनही एखाद्या व्यक्तीला शिधापत्रिका अथवा मतदार ओळखपत्र मागून अडवणूक करणारी आपली व्यवस्था कधी बदलणार आहे हा प्रश्न मला नेहमी पडतो.एखाद्या विधवा निराधार महिलेला संजय गांधी निराधार योजनेचे 600/- +रुपये अनुदान मिळविण्यासाठी शंभर वेळा तालुका मुख्यालयाला चकरा मारायला लावणारी व्यवस्था मी जवळून बघितली आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेत ज्यांना साधा withdrawal form भरता येत नाही त्या सामान्य माणसांकडून तो फॉर्म भरून देण्यासाठी प्रत्येकी/-20 घेऊन त्यांना लुटण्याची सोय प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे.साहेब शेतकऱ्यांना पन्नास साठ हजारांचे कर्ज देताना आपल्या बँका फारच दक्ष होतात व दुसरीकडे याच बँका स्वतः ला सहा-सहा हजार कोटींचा चुना लावून घेतात हे गणित मला अजुनही उमगले नाही.शासकीय रुग्णालयात सामान्य माणसाची मृत्यूनंतरही हेळसांड का थांबत नाहि??साहेब नेहमीच मी बघतो कि नागपूर हिवाळी अधिवेशन आले की,मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न उपस्थित का होतो? बाकी वर्षभर तिथे कुपोषण अथवा दुर्दैवी बालमृत्यू होत नाहीत काय? घटनेने त्यांना दिलेला जगण्याचा अधिकार आपण हिरावून घेत नाही आहोत काय???मग हे होत असताना दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या नावाखाली विधान भवन,आमदार निवास व मा.मंत्रांच्या बंगल्याच्या रंगरंगोटीवर कोट्यवधींचा चुराडा कसा काय होतो,?असा कोणता पेंट वापरते सरकार कि तो दरवर्षी खराब होतो?अधिकरी व मंत्री महागड्या हॉटेल मधे थांबणार असतील तर हे बंगले रंगवायचे कशाला.????साहेब कृपया आपण हे पत्र वैयक्तिक घेऊ नका.स्वातंत्र्यानंतर ज्यांनी ज्यांनी मिळून सत्ता भोगली त्या सर्वांना माझा प्रश्न आहे.उठता बसता छ.शाहू,म.फुले व डॉ.आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात दर आठवड्यात दलितावर अत्याचार कसे काय होतात? मेट्रो स्मार्ट सिटी नक्कीच उभारा पण एकदा आदिवासी भागात जाऊन बिना तेलाची भाजी कशी बनते,त्या भाजीची चव कशी असते ते तर बघा…...साहेब डिजिटल india झालाच पाहिजे पण मग गावातील अथवा सामान्य माणसाला Twitter account कोण उघडून देणार???? नाही म्हणजे मागे वाशीम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पत्र दिले उपयोग नाही झाला.त्याने नंतर आत्महत्या करून आपली सुटका करून
घेतली...।त्याच्याजवल ट्विटर खाते नव्हते म्हणून त्याची कुणी दखल घेऊ नये काय???digital इंडिया e_ governance नंतर होईल आपण माणसाला किंमत कधी देणार आहोत???शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात मान सन्मान कधी मिळणार?थातूर मातूर उपाययोजना करण्यापेक्षा भ्रष्टाचाऱ्यांना फाशी कधी होणार???स्त्री भ्रूण हत्या कधी थांबणार???तसे करणार्यांना फाशी का होऊ नये???
मा.मुख्यमंत्री महोदय समस्या तर खुप आहेत.तुम्ही ज्या तत्परतेने कपिलसाठी आपली व्यवस्था कामी लावली तीच तत्परता जर वरील प्रश्नासाठी वापरली तर सुशासन यायला खूप वेळ लागणार नाही पण तिथे राजकारण आडवे येते.कपिल ला राजकारणात येण्यास वाव आहे आणि कसं आहे.. कोण कीती कर भरतो याला प्राधान्य देण्याऐवजी...आपण आपल्याला जनतेने का व कशासाठी राज्य कारभार हातात दिला याचेही थोडे भान ठेवावे.नाहीतर कपिलसारख्यानी आरोळ्या द्यायच्या...।बिनडोक वृत्तवाहिन्यांनी कुठलीही शहानिशा त्याला प्रसिद्धी द्यायची व नंतर सगळ्यांनीच तोंडघशी पडून आपला मुखभंग करायचा हे थांबले पाहिजे..साहेब आपण कल्पक,अभ्यासू व प्रामाणिक आहात यात काही शंका नाही...मग उद्यापासून आम्हीपण आपल्या खऱ्या समस्या Twitter वर मांडायच्या काय??आणि आमच्या समस्यांची दखल कोण घेणार...??आपल्या घराचे अनधिकृत बांधकामाचे फुटकळ कारण समोर करायचे व मी कर भरतो म्हणून देशाच्या पंतप्रधानाला सरळ सरळ ट्विटर वर Tag करायचे बिनडोक वृत्तवाहिन्यांनी त्याला फुकटात प्रसिद्धी द्यायची व भुरट्या विद्वानाना स्टुडिओत बोलावून फुकट चर्चा करायची यालाच Comedy Show म्हणतात..।
कळावे लोभ असावा...।
आपला नम्र
No comments:
Post a Comment