बोधकथा

Thursday, 8 September 2016

अध्ययन-अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर

मानव आणि तंत्रज्ञान यांचा फार जुना संबंध आहे.अगदी प्राचीन काळापासून मानव तंत्रज्ञानाचा वापर करत आलेला आहे,अथवा त्याने ते विकसित केलेले आहे.अग्नीचा शोध,चाकाचा शोध अथवा कागदाचा शोध असो त्याने त्यामध्ये प्रत्येकवेळी नवनवीन भर घालून  मानवी जीवन सुसह्य बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे.आज 21 व्या शतकात तंत्रज्ञानाने मानवी जीवनातील सगळी क्षेत्रे व्यापून टाकली आहेत. भारतीय शिक्षण व्यवस्था संक्रमनाच्या टप्प्यातून जात असताना त्यात तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे.अथवा तो नक्कीच वाढविला गेला पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे.
                             अध्यापनात योग्य पद्धतीने व विचारपूर्वक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अध्ययन अध्यापन नक्कीच आननंदायी होऊ शकते. असे चित्र आज आपणास खुप ठिकाणी बघावयास मिळत आहे.तंत्रज्ञानाच्या योग्य वापराने विचारांची क्षेत्रे रुंदावण्यास मदत होते.तंत्रज्ञानाचा वापर शिक्षक व विद्यार्थी या दोहोंसाठी उपयुक्त आहे.दर्जेदार व प्रभावी अध्यापणास पूरक साहित्य म्हणून आपणास नवीन तंत्रज्ञानाची नक्कीच मदत होऊ शकते.यात आपणास मोबाईल, लॅपटॉप,कॉम्पुटर,प्रोजेक्टर,टॅबलेट मोबाईल इ.विविध साधनांचा वापर करता येईल.बाजारात उपलब्ध साहित्याशिवाय काही तंत्रस्नेही शिक्षकांचा स्व-निर्मित तंत्रसाहित्य निर्मितीवर विशेष भर आहे.ही फार अभिमानास्पद बाब आहे.
                             दूरस्थ शिक्षणात तंत्रज्ञान हे खूप प्रभावी माध्यम आहे.शेकडो किलोमीटर दूर बसलेला विद्यार्थी मी बनविलेली चाचणी ऑनलाईन सोडवितो, हे प्राथमिक शिक्षकाला कधीही न पडलेले स्वप्न आज तंत्रज्ञानाने साकार करून दाखविले आहे.विद्यार्थी सुद्धा स्व प्रेरनेने तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या ज्ञानात भर घालत आहे.शेकडो किलोमीटर दूर असलेले शिक्षक आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुर्गम भागापर्यंत पोहचून विद्यार्थ्याची ज्ञानाची भूक भागवित आहेत.अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञानाच्या वापराने विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित बदल नक्कीच घडून येतात.
                         तंत्रज्ञानाची उपयुक्तता साधनांच्या परिणामकारक वापरावर अवलंबून आहे.शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.Whats app वर शैक्षणिक चळवळ रुजत आहे.Facebook वर भरपूर माहिती देणारे शैक्षणिक pages उपलब्ध आहेत.त्यांचाही आपणास संदर्भ म्हणून वापर करता येईल. तंत्रज्ञानाने अध्ययन अध्यापनात क्रांती घडविली हे  सत्य आहे पण आता गरज आहे ती शिक्षकांनी आपल्या व विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून स्वतः तंत्रज्ञान विकसित करण्याची....व इतर शिक्षक बांधवाना त्यासाठी प्रेरित करण्याची.
                           खुप तंत्रस्नेही शिक्षक microsoft power point चा खूप छान वापर करत आहेत.काही विद्यार्थ्यांना दैनंदिनी लिहायची सवय असते, त्यांना आपण त्यांचा वैयक्तिक Blog तयार करून देऊन त्यावर लिहिण्यास प्रेरित केले पाहिजे,आपल्या वर्गाचा अथवा शाळेचा पण ब्लॉग तयार करता येऊ शकतो. Twitter account ला तालुक्यातील सर्व शाळा जोडून आपल्याला कोणत्याही शाळेतील उपक्रम बघता अथवा share करता येतील.एक उपयुक्त शैक्षणिक साहित्य म्हणून Google सर्च इंजिन चा उपयोग नक्कीच झाला पाहिजे.
                          प्रसिद्ध वैज्ञानिक Thomas Edison यांनी खूप वर्षाअगोदर भविष्यवाणी केली होती की,"Books will be soon obsolete in the public school our education system will be changed inside of ten years"अमेरिका या देशासाठी केलेली भविष्यवाणी सत्यात उतरायला खूप वेळ लागला.पण आज ती भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे.tablet school,digital school,E_class room ची संकल्पना हळूहळू मूळ धरत आहे.पाठीवरील दफ्तराचे ओझे कमी करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.कुठल्याही साधनाला मर्यादा ह्या असणारच.संकल्पना स्पष्ट करण्यासाठी तंत्रज्ञान हे अतिशय आवश्यक आहे.याच तंत्रज्ञानाचा योग्य तो  वापर आपणास विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यास करावयाचा आहे,तरच आपण खरे स्मार्टफोन वापरणारे स्मार्ट शिक्षक म्हणून समाजात ओळखले जाऊ...।

गणेश तु.कुबडे
स.अ
उच्च प्राथमिक शाळा, विखणी.
जि.वर्धा
                          
3 comments:

  1. खुपच छाम माहीती सरजी..

    ReplyDelete
  2. मानव आणि तंत्रज्ञान यांचा फार जुना संबंध आहे.अगदी प्राचीन काळापासून मानव तंत्रज्ञानाचा वापर करत आलेला आहे,अथवा त्याने ते विकसित केलेले आहे.अग्नीचा शोध,चाकाचा शोध अथवा कागदाचा शोध असो त्याने त्यामध्ये प्रत्येकवेळी नवनवीन भर घालून मानवी जीवन सुसह्य बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे.आज 21 व्या शतकात तंत्रज्ञानाने मानवी जीवनातील सगळी क्षेत्रे व्यापून टाकली आहेत. भारतीय शिक्षण व्यवस्था संक्रमनाच्या टप्प्यातून जात असताना त्यात तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे.अथवा तो नक्कीच वाढविला गेला पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे.