बोधकथा

Saturday, 3 September 2016

बदलत्या शैक्षणिक प्रवाहात शिक्षकांपुढील आव्हाने

कोणत्याही देशाचा विकास ह्या त्या देशातील सुशिक्षित,सुजाण व सुसंस्कृत मनुष्यबळ यावर अवलंबून असतो.देशाच्या जडणघडणीत आनि सामाजिक आर्थिक प्रगतीत शिक्षणाचा वाटा महत्वपूर्ण असतो.कौशल्याधिष्टीत शिक्षण हि 21 व्या शतकाची गरज आहे.त्यासाठी आ पण अभ्यासक्रम, शि क्षकांची गुणवत्ता व मूल्यमापन या तीन गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.शि क्षकांना आजच्या बदलत्या शैक्षणिक प्रवाहातील आव्हाने स्वीकारण्यास तयार रहावे लागेल.
                     एका बाजूला जागतिकीकरण व दुसरीकडे आपल्या राष्ट्रीय महत्वाकांक्षा यामुळे शैक्षणिक प्रवाहात वेगाने बदल होत आहेत.दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण हे शिक्षकांपुढील एक आव्हान आहे।कारण गुणवत्ता ही आपणास भौतिक कासोट्यावर मोजता येत नाही.मानव व मानवी मेंदू ही अ तिषय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे फक्त ज्ञान व कौशल्ये यांचा विकास नसून त्यात मूल्य,अभिवृत्ती व भावनात्मक बाबींचा समावेश होतो.प्रत्येक विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परिपूर्ण प्रयत्न करणे ही शिक्षकांची खरी कसोटी आहे.गुणवत्तेचा शोध ही न संपणारी प्रक्रिया आहे.
                       तंत्रज्ञानविषयक बदल हे आ जच्या काळातीळ प्रमुख वास्तव आहे.रोज नवनविन शोध व तंत्रज्ञान विकसित होत आहे.ते शोध व तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे.शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा उपयोग दैनं दिन अध्यापनात केला पाहिजे.नवीन तंत्रज्ञान आत्मसात न केल्याने काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे "नोकिया" हि मोबाइल कंपनी.एकेकाळी मोबाइल क्षेत्रात संपूर्ण जगावर अधिराज्य गाजविणारी हि बलाढ्य कंपनी नवीन तंत्रज्ञानासोबत न जुळविता आल्यामुळे तोट्यात गेली व नंतर मायक्रोसॉफ्ट या कंपनीने त्या कंपनीला विकत घेतले.याहू सर्च इंजिन हेही एक उदाहरण देता येईल.यासाठी शिक्षकांनी तंत्रज्ञाविषयक जागरूक असणे आवश्यक आहे.
                           ज्ञानरचनावाद म्हणजे काय? हे फक्त प्रशिक्षणातून शिकता येणार नाही.यासाठी आपणास विविध संदर्भ ग्रंथ तपासावे लागतील.ज्ञानरचनावाद आत्मसात करून त्याचे उपयोजन करणे आवश्यक आहे.तरच आपल्याला अपेक्षित असलेली सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता प्र त्यक्षात आणता येईल.संपूर्ण भारत देशात महाराष्ट्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांना  डिजिटल शाळेत रूपांतरित करण्यात अग्रेसर आहे.डिजिटल शाळा करणे वेगळे व प्रत्यक्ष त्यातील साहित्याचा उदा.मोबाईल, टॅबलेट,संगणक,लॅपटॉप इ.साहित्याचा सुयोग्य वापर करून पाठयाचा आशय स्पष्ट करने हे एक आव्हान आहे.वर उल्लेखलेली सर्व साधने आहेत साघ्ये नाहीत.त्या साधनांचा योग्य वापर करण्यासाठी शिक्षकांनी त्यांची संपूर्ण माहिती मिळविणे व स्वतः त्यासाठी तत्पर असले पाहिजे.शैक्षणिक धोरणांची उद्दिष्ट्ये,अभ्यासक्रम, पाठ्यन्श व आधुनिक तं त्र ज्ञान यांचा सुरेख संगम आपणास साधता आला पाहिजे.
                           लोकसंख्या वाढीबरोबर शाळेतील विद्यार्थी संख्या वाढतच आहे.वाढत्या संख्येसाठी सुविधा अपुऱ्या पडत आहेत त्यासाठी आर्थिक तरतूद करणे अवघड जात आहे.लोकसहभागग हा त्यावर एक उपाय  होऊ शकतो पण त्याला मर्यादा आहेत.विद्यार्थ्यांची गळती ही गंभीर समस्या आहे.गळती अनेक कारणांनी होते.प्रशासकीय दुर्लक्ष,पालकांचे दारिद्र्य,मुलींच्या शिक्षणाबाबत उदासीनता,शाळांच्या अपुऱ्या सोयी-सुविधा इ.विद्यार्थी-शिक्षक व पालक यांच्यात सुसंवाद वाढविणे ही आजच्या काळाची गरज आहे.सुसवादामुळे अनेक गोष्टींची उकल होते.शहरी व ग्रामीण भागात मिळणाऱ्या सोयोसुविधा यातील तफावत यावर चिंतन करून नवीन मार्ग शोधणे गेले पाहिजेत.
                    मूल्यमापणविषयक अडचण  आणखी एक मोठा विषय आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्ट्ये व ध्येये साध्य करताना मूल्यमापन अपरिहार्य आहे.पण त्यात भरपूर अडचणी आहेत.अभ्यासक्रम एकांगी आहे,शहर व खेडे यात अनेक बाबतीत भिन्नता असल्यामुळे शहरातील व खेड्यातील मुलांना एकच अभ्यासक्रम योग्य नाही.पुस्तकातील प्रमाणभाषा व क्षेत्रीय भाषा यात तफावत असते.उदा.यवतमाळ जिल्ह्यातील कोलामी व बंजारा भाषा तसेच गडचिरोली व अमरावती या भागात हीच समस्या आहे.एखाद्या माणसाने पीएच.डी.केली प्राप्त केली पण तो माणूस म्हणून पात्र असेल असे आवश्यक नाही.पीएच.डी हे मूल्यांकन झाले पण माणूस महणून जर त्या व्यक्तीकडे जबाबदारीची जाणीव,सहकार्य,सहानुभूती,दुर्बलांबाबत आदर इ.गुण नसेल तर आपले मूल्यमापण व्यर्थ मानायचे काय?गुणवत्ता हु विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित मानली तरी बोधात्मक,भावात्मक व क्षमता यांचा त्यात समावेश होतो.प्रत्येक विद्यार्थ्यांचे सापेक्ष मूल्यमापन करणे कठीणच आहे.
                       भारतीय शैक्षणिक क्षेत्राला हजारो वर्षाचा इतिहास व उज्वल परंपरा आहे.अनेक अडचणीवर मात करून शिक्षकांनी नेहमी नाविन्याचा ध्यास घेतलेला आहे.बदलत्या शैक्षणिक प्रवाहात आव्हाने हि येणारच,यासाठी शिक्षकांनी विध्यार्थ्यांप्रति प्रेमाची भावना,त्यांना मदत करण्याची तयार ठेवली पाहिजे.त्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला पाहिजे.आपल्या कार्याचा समाजावर व देशावर काय परिणाम होईल याचे चिंतन करून शिक्षकी पेशाच्या भूमिकेचा मनोमन स्वीकार करून जबाबदारीची सतत जाणीव ठेवावी.आपण जे कार्य करीत आहोत ते काळजीपूर्वक, कळकळीने व उत्कृष्टपणे करणे हा गुण जोपासने आवश्यक आहे।तरच बदलत्या शैक्षणिक प्रवाहातील आव्हाने आपण लीलया पेलू शकू व उद्याच्या सामर्थशाली भारताच्या जडणघडणीत आपले योगदान देऊ या
       

        -गणेश तु.कुबडे.
                   स.अध्यापक
                    जिल्हा- वर्धा.।।

No comments:

Post a Comment