1998-2000 चा काळ होता.नुकतंच महाराष्ट्र सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत इंग्रजी विषय अनिवार्य केला होता.आमच्या D.ed.कॉलेज ला वाद- विवाद स्पर्धा सुरू होती "प्राथमिक शिक्षणात इंग्रजी विषय आवश्यक कि अनावश्यक" या विषयावर…माझा स्पर्धेत सहभाग नव्हता वा मी भाग घेतला नव्हता.कारण एकदा मी "विसाव्या शतकातील सर्वोत्तम व्यक्तीमत्व" या विषयावर बोलताना एडॉल्फ हिटलर या व्यक्तिमत्वाला सर्वोत्कृष्ट म्हटले होते.ते माझे वैयक्तिक मत होते.माझ्या भाषण कौशल्याचे कौतुक झाले.पण नंतर आमच्या महाविद्यालयाचे गांधीवादी विचाराचे संचालक यांनी मला वैयक्तिक पाचारण करून माझे कान
उघडले.माझा स्वभाव जो आज आहे तेव्हाही तसाच होता.मी त्यांना कडक प्रतिउत्तर दिले त्यांना ते आवडले नाही.त्यांनी माझ्या भाषणावर महावीद्यालयात बंदी घातली.तेव्हापासून मी बोलणेच बंद केले.आता तुटकं- फुटकं लिहितो.तर त्या इंग्रजी विषयाच्या स्पर्धेत स्पर्धक येत होते बोलत होते.पण बहुतेकांचा एकच नारा
होता.....आपला तोच नारा हो.... कि," विद्यार्थी हा मातीचा गोळा आहे......शिक्षक हा कुंभार आहे..." माझ्या डोक्याला काही ते पटत नव्हतं.( म्हणजे मी काही तेव्हा पियाजे चा follower होतो असे कुणी वाटून घेऊ नका)पण सांगणार कुणाला...?इतरांना नंतर सांगावं तर ते माझ्यावर हसत होते.काही दिवस बेकारी सोसली नंतर 2003 ला शिक्षण सेवक झालो.
लहानपणी खडू- फळा योजना, प्रौढ साक्षरता अभियान, smart P.T.असे करता करता आनंददायी शिक्षण,वाचन लेखन प्रकल्प..उदंड प्रशिक्षणे.तालुक्यावर कमी आहे म्हणून जिल्ह्यावर.तिथे कमी म्हणून आम्हाला बाबा आमटेंच्या सोमनाथ येथील प्रकल्पात पाठविले होते...असे करता करता आज आमची गाडी ज्ञानरचनावादावर येऊन धडकली आहे.शिक्षण क्षेत्रात नवीन प्रयोग व उपक्रम आणावेच लागतात.नाहीतर शिक्षण क्षेत्राला "अर्थ" कसा प्राप्त होणार???"विद्यार्थी हा स्व अनुभवातून अंगभूत कौशल्याने, टप्प्या- टप्प्याने शिकत असतो असा ज्ञानरचनावादाचा काय तो सारांश.बरे झाले हे आम्हाला पीयाजे नावाच्या शिक्षण तज्ज्ञाने सांगितले आमचा एखादा शिक्षण तज्ज्ञ असता तर आम्ही केव्हाच त्याला उडवून लावला असता.असे नवे वाद व उपक्रम आणावे लागतात.तेव्हाच काय तो शिक्षण क्षेत्राला अर्थ प्राप्त होतो.
कधी नव्हे ते अधिकारी पण प्रेरणा द्यायला लागलेत.आपुलकीचा सेतू तयार झाला.संपूर्ण महाराष्ट्र कामाला लागला.जीर्ण भिंती बोलू लागल्यात.म्हणजे आधी भिंती अथवा वर्ग कोपरे बोलके नव्हते असे नव्हे तर तेव्हा whats app अथवा फेसबुक नव्हते.आपले कार्य जगासमोर मांडायला.ज्ञानरचनावादाचा उपयोग होऊ लागला.विद्यार्थी पण आता बोलू लागलेत. शिक्षण क्षेत्रात एक चळवळ तयार झाली.सर्व शिक्षक वर्ग कामाला लागला. वृत्तपत्रांचे रकाने शैक्षणिक चळवळीला समर्पित होऊ लागलेत.बदल कसा असतो ते जवळून बघता आला. लोकसहभागातून माझी शाळा पण डिजिटल झाली सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत माझ्या शाळेला पण तालुक्यातून द्वितीय पारितोषिक मिळाले.गावकऱ्यांनी पण आमचे कौतुक केले.आम्ही सर्व शिक्षकांनी मिळून शाळा एका नवीन उंचीवर याचा अभिमान वाटतो.
पण येथेही आता सरकारी दंडुक आडवं येताना दिसत आहे.काहीच मोजक्या विभागातील शाळांचा उदोउदो होत आहे.सरकारी आदेशावरून इकडचे विदर्भातील शिक्षक प्रेरणा घेऊन आपल्या जीवाचे हाल करून शेकडो किलोमीटर अंतर कापून शाळांचे दौरे करत आहेत.इकडे विदर्भात पण भरपूर काम झाले आहे पण नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष. आम्ही कितीही ज्ञानरचनावाद सांगितला तरी शेवटी 25 कलमी कार्यक्रमाचं ओझं आमच्या डोक्यावर ठेवलेले आहेच.ज्ञानरचनावाद ही अथांग संकल्पना आहे.त्या संकल्पनेला आपण 100 गुणांच्या चौकटीत बंदिस्त करत नाही आहोत काय?व तशी ती 100 गुणांची चौकट पार करायलाच हवी हा अट्टाहास का बरं.फक्त प्रेरणा घ्या तुम्ही बोलू नका असे म्हणणे कितपत योग्य आहे.जो बोलला त्याची टिंगल होताना दिसत आहेत.उपक्रम जरूर राबवावेत पण ते उपक्रम जर फक्त अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल उत्कृष्ट करण्यासाठी राबविले जात असतील तर त्याचा काही उपयोग नाही.
माझ्या शालेय जीवनात मी फक्त संगणकाची व्याख्या पाठ केली.पण आमच्या शिक्षकांनी कधी आम्हाला शाळेतील संगणक दाखविला नाही.अमिबा हा इकपेशीय जीव आम्ही पुस्तकातच बघितला. तसे आज होऊ नये म्हणून प्रत्येक शिक्षक धडपडत आहे.लोकवर्गणीतून अथवा स्व खर्चातून सर्वच शिक्षक अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्या शाळेत आणण्याचा प्रयत्न करत आहेत.इ.दुसरीतील विद्यार्थी संगणक हाताळत आहेत.हे बघून होणारा आंनद शब्दात सांगता नाही येणार.नुकतेच आमच्या वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथील शिक्षक भगिनींनी तंत्रस्नेही प्रशिक्षणात विविध कौशल्ये आत्मसात केलीत.स्व निर्मित online _ offline चाचणी.Mobile application, Website तयार करणे हा नक्कीच एक मैलाचा दगड आहे.विद्यार्थी व शिक्षक हे दोघेही तंत्रस्नेही असलेच पाहिजे.तरच आपण समोरच्या स्पर्धेत टिकून राहू शकतो.Tab,Computer,Laptop इ.साधने विद्यार्थ्याला हाताळता येणे ही काळाची गरज आहे.
काही शिक्षकांनी याही पुढे जाऊन तंत्रज्ञान क्षेत्रात चांगले काम केले आहे.पण इथेही सरकारी घोडे आडवे येत आहे.शासनाला आता सर्वच बाबी online हव्या आहेत.तेथूनच सुरु होतो अव्यवस्थेचा प्रवास.SARAL portal अजूनही सरळ नाही झालेले आहे. महत्वाचे म्हणजे प्रशासनाकडून याबाबत कुठलेही मार्गदर्शन होत नाही आहे.शासनाला याबाबतीत कुठलेही प्रशिक्षण का घ्यावेसे वाटत नाही हा खुप मोठा चिंतनाचा विषय आहे.शालार्थ मुळे वेतनास विलंब होत आहे.MDM चे घोडे अजूनही अडकलेलेच आहे.मुख्याध्यापक रात्री अपरात्री माहिती भरताना दिसत आहेत.त्यांची प्रकृती कोण सांभाळणार???कि फक्त प्रेरणा घ्या म्हणायचे व आता अधिकाऱ्यांनी गायब व्हायचे.वरील सर्व शालार्थ, सरल, MDM या विषयावर पं.स.स्तरावर अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झाले आहे काय? हा संशोधनाचा विषय आहे.एखाद्या मुख्याध्यापकाला काही अडचण आल्यास त्याचे समाधान करायला कुठलीही यंत्रणा नाही आहे.शिक्षकच यातून मार्ग काढताना दिसत आहेत.मग एवढ्या मोठ्या अजस्त्र पर्यवेक्षीय यंत्रणेचा फायदा तो काय???
शासनाने अनंत शैक्षणिक योजना व उपक्रम आणावेत त्यास कुठल्याही शिक्षकाचा विरोध नसतो.पण त्यात नियोजन व सुसूत्रता असणे आवश्यक आहे.हा एवढा व्याप सांभाळताना द्विशिक्षकी शाळेच्या मु.अ.ची कल्पना न केलेली बरी.ज्ञानरचनावाद जुना झाल्यावर शासनाने एक उपक्रम जरूर राबवावा व त्याचे नाव ठेवावे " उपक्रम व योजनराहित शिक्षण" म्हणजे शिक्षकांना अगदी त्यांच्या मनाप्रमाणे व विद्यार्थ्यांना मोकळेपणाने शिकता येईल.नाहीतरी आता 25 कलमे पूर्ण कारण्यावरच भर आहे.थोडी आम्हालाही मोकळीक द्या...थोडे आम्हालाही बोलू द्या...वरून उपक्रम आणायचे शिक्षकावर व विद्यार्थ्यावर लादायचे यात कसला आलाय ज्ञानरचनावाद....???
बोधकथा
- Home
- संकलित मूल्यमापन
- बोधकथा
- बालगीते
- सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे (हिंदी)
- आपला वर्धा जिल्हा
- राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा
- शाळा साहित्य
- Computer Shortcut Keys
- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
- अभ्यासाचे तंत्र व मंत्र
- चालू घडामोडी
- महत्वाचे पर्यावरणविषयक व सामाजिक दिवस
- विरामचिन्हे
- 100% मूलभूत वाचन विकास
- NAS अध्ययन स्तर निश्चिती
- संवर्गनिहाय जात माहिती
- मराठी स्वराज्याचा इतिहास
- शिक्षकांची कर्तव्ये आणि भूमिका
- सेवा पुस्तक नोंदी..नियम व अटी
- श्री सुरज वैद्य यांची व्यंगचित्रे
- एक भारत श्रेष्ठ भारत - भाषा संगम उपक्रम
- Tech Sudha You Tube Channel
- सातवे वेतन आयोग अधिसूचना
- शाळा सिद्धी मानके व मूल्यांकन आराखडा
- मतदार यादीत शोधा आपले नाव
- राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा मसुदा 2019 ( मराठी )
- सामान्य ज्ञान
Saturday, 24 September 2016
ज्ञानरचनावाद व तंत्रस्नेही चळवळीकडे वळताना.....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment