महाराष्ट्रातील स्थानिक पालिका,परिषदांचे निकाल हा एका पक्षाचा निर्विवाद विजय असला तरी तो सजग व शहाण्या जनतेने स्वयंप्रेरणेने दिलेला कौल आहे.असे म्हणायला हरकत नाही.सामान्य जनतेने
असहिष्णुता,अराजकता व आता नोटबंदीवरून काही मूठभर लोकानी जो भ्रमाचा बुडबुडा तयार केला होता त्यावर चोख भाषेत उत्तर दिले.2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर लोकनियुक्त सरकार विराजमान झाल्यावर मा.देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून सूत्रे सांभाळली तेव्हा स्थिती फारच नाजूक होती .संघाचा कार्यकर्ता,नगरसेवक,महापौर,आमदार ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे.अत्यंत अभ्यासू,शांत,निष्कलंक असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला पण इथेही काहींना पोटदुखी झाली.महाराष्ट्रात पेशवाई आली म्हणून काही लोक बोंबा ठोकू लागले.ते अजूनही या पालिका निवडणुकीत बघायला मिळाले.मागील नगरपालिका निवडणुकीचा फड जिंकल्यावर मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक अगदीच गांभीर्याने घेत संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला.एक एक सभा नीट हाताळून त्यांनी हा एकहाती विजय मिळविला उगाच त्यांनी गुहेत बसून डरकाळ्या न फोडता आलेली निवडणूकच अंगावर घेतली व स्वतःला सिद्ध करून दाखविले.ग्रामीण भागात कुठेही विशिष्ट वजन नसणाऱ्या पक्षाने आज संपूर्ण महाराष्ट्र पादक्रांत करावा ही गोष्ट अजूनही काही लोकांना पचनी पडलेली दिसत नाही.
मुख्यमंत्री महोदयांचा कामाचा प्रचंड वेग बघता त्यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे असे वाटते.भटक्या विमुक्तांच्या प्रश्नापासून पाणी आणि रोजगारासारख्या विषयांवर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात आपल्या सरकारची पकड त्यांनी उत्तम बसविली आहे असेच म्हणावे लागेल.काही विशिष्ट माध्यमांची सोबत नसतानाही आपल्या कामाच्या व तळमळीच्या जोरावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एक नवचैतन्य निर्माण करण्यात यश मिळविले आहे. ते एकटे नाहीत तर त्यांच्यामागे एक निष्ठावान भव्य संघटन उभे आहे.निवडणूक काळात कुणी काहीही आश्वासने द्यावीत व जनतेने त्याला बळी पडायचे ते दिवस आता इतिहासजमा झालेले आहेत.मा.फडणवीस साहेबानी इथेही पथ्य पाळलं.मोजकेच बोलले पण फक्त आणि फक्त आपल्या सरकारच्या कामावरच त्यांनी भाष्य केले.उत्तर नागपुरातून 10 जागेवर कमळ उगविणे हा चमत्कार नसून मा.फडणवीस साहेबावरील विश्वास आहे.या मागे त्यांची तपश्चर्या आहे.या कामात त्यांना केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री मा.नितीनजी गडकरी यांची मोलाची साथ मिळाली हेही विसरून चालणार नाही.यापुढे पक्षाची राजकीय सूत्रे नागपुरातूनच हलणार याची तजवीज या दोहोंनी खांद्याला खांदा लावून आजच करून ठेवली आहे.आपला पक्ष आता बहुजनांचा पक्ष आहे हे या दोन्ही मंडळींनी सिद्ध करून दाखविले आहे किंबहुना जनतेने अगदी पंचायत समिती स्तरावसुद्धा याची मोहोर उमटविली आहे. जातीय अंताची लढाई लढता लढता अगदी कट्टर जातीयवादी झालेल्या पक्षांनी व लोकांनी हे वास्तव नाकारून चालणार नाही.हेच वास्तव समजून घेत जनतेने मतेही दिली आहेत.हा जातीयवाद कुठेतरी संपलाच पाहिजे व तशी सुरुवात आता झालेली आहेच.हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी राजे,फुले,शाहू व डॉ.आंबेडकरांचा आहे व हीच ओळख कायम टिकवायची असेल तर सर्वानीच मिळून पावले उचलावी लागेल.तडफदार निर्णय व तात्काळ अंमलबजावणी हे फडणवीस साहेबांचे प्रमुख सूत्र आहे.जलयुक्त शिवार हे त्याचे एक उत्तम उदाहरण सांगता येईल.सोबतच धार्मिक स्थळामध्ये स्त्रीयांच्या प्रवेशासंदर्भात त्यांनी घेतलेली भूमिकाही प्रशंसनीय आहेच.या सोबतच मा.मुख्यमंत्री महोदय शेतकऱ्यांच्या पिकाला मिळणारा हमीभाव व शेतकऱ्यांच्या इतर ज्वलंत प्रश्नावर लवकरच लक्ष देतील अशी अपेक्षा करू या.त्यासाठीच सामान्य जनतेने त्यांच्यावर अगदी गाव खेड्यापासून ते संपूर्ण महाराष्ट्रभर विश्वास दाखविला आहे.हा विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे व तो ते टिकवून ठेवतील यात तिळमात्र शंका नाही.
मा.मुख्यमंत्री साहेब या विजयाचे एवढेच वर्णन करता येईल,
" शानदार ......जबरदस्त... जिंदाबाद....."
बोधकथा
- Home
- संकलित मूल्यमापन
- बोधकथा
- बालगीते
- सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे (हिंदी)
- आपला वर्धा जिल्हा
- राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा
- शाळा साहित्य
- Computer Shortcut Keys
- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
- अभ्यासाचे तंत्र व मंत्र
- चालू घडामोडी
- महत्वाचे पर्यावरणविषयक व सामाजिक दिवस
- विरामचिन्हे
- 100% मूलभूत वाचन विकास
- NAS अध्ययन स्तर निश्चिती
- संवर्गनिहाय जात माहिती
- मराठी स्वराज्याचा इतिहास
- शिक्षकांची कर्तव्ये आणि भूमिका
- सेवा पुस्तक नोंदी..नियम व अटी
- श्री सुरज वैद्य यांची व्यंगचित्रे
- एक भारत श्रेष्ठ भारत - भाषा संगम उपक्रम
- Tech Sudha You Tube Channel
- सातवे वेतन आयोग अधिसूचना
- शाळा सिद्धी मानके व मूल्यांकन आराखडा
- मतदार यादीत शोधा आपले नाव
- राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा मसुदा 2019 ( मराठी )
- सामान्य ज्ञान
Sunday, 26 February 2017
शानदार....जबरदस्त....जिंदाबाद...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment